नागपुर समाचार : संत रामपाल जी महाराज अवतरण दिनानिमित्ताने हुंडामुक्त विवाह सोहळा ढवळपुरी येथील सतलोक आश्रम परिसरात संत समाजात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या संत रामपालजी महाराजांच्या अवतरण दिनानिमित्त विशेष सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात समाजहित व अध्यात्म यांचा संगम पाहायला मिळला आहे.
देशाच्या विविध राज्यांतून व विदेशांतून येणाऱ्या लाखो अनुयायांची गर्दी लक्षात घेऊन आश्रम प्रशासनाने काटेकोर नियोजन केले होते. संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या याविवाहात वधू-वरांच्या कुटुंबियांकडून कोणत्याही प्रकारचा हुंडा घेतला नाही. विवाह सोहळा पूर्णपणे साधा, पवित्र व शास्त्रनिष्ठ पद्धतीने पार पाडला. यामुळे समाजात वाढत्या हुंडा प्रथेला आळा बसावा, आर्थिक भार कमी व्हावा आणि समतेचा संदेश पोहोचावा हा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमस्थळी विशाल भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लाखो भाविकांना निःशुल्क व स्वच्छ जेवण पुरविण्याची तयारी केली होती.
गर्दी व्यवस्थापनासाठी निःशुल्क पार्किंग व्यवस्था होती. सर्वत्र सुरक्षा, पाणी, निवास व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिले. सत्संगाद्वारे संत रामपाल जी महाराज मानव जीवनाचा मुख्य उद्देश म्हणजे मोक्ष प्राप्त करणे. त्यांच्या प्रवचनांमधून चार वेद, गीता, कबीर वाणी इत्यादी प्रमाणग्रंथांच्या आधारे खऱ्या भक्ति मार्गाचे ज्ञान दिले. निःशुल्क नामदीक्षा उपक्रम राबवून अध्यात्मिक उन्नतीसाठी इच्छुक भाविकांना दिक्षा दिली. आश्रम परिसरात भव्य प्रदर्शन व धार्मिक ग्रंथ प्रदर्शनी सुरू करण्यात आली. यात सत्संग पवित्र ग्रंथ, जीवनमूल्ये, व्यसनमुक्ती, यांसारख्या सामाजिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
भाविकांना अध्यात्मा बरोबरच सामाजिक जाणीव व जीवनाचा संदेश मिळाला. संपूर्ण कार्यक्रम पारदर्शकता, साधेपणा व निःस्वार्थ भावनेवर आधारित होता. समाजहित, अध्यात्म व मानवतेचा संदेश देणारा ठरला. यावेळी ८०० भावी स्वयंसेवकांनी रक्तदान केले आणि ३४४० लोकांनी त्यांचे देहदानाचा संकल्प केला. हा अवतरण सोहळा केवळ उत्सव नाही तर समाजपरिवर्तनाची प्रेरणा आहे. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.