
▪️ मनपा तर्फे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या संकल्पने अंतर्गत मिळणार
नागपुर समाचार : महापालिका आयुक्त, नागपूर डॉ. अभिजीत चौधरी यांनी (ता. २१ मार्च) सादर केलेल्या अर्थसंकल्पात “बेटी बचाओ बेटी पढाओ” या संकल्पनेद्वारे महापालिका शाळांमधील मुलींचा टक्का वाढावा यासाठी ही विशेष तरतूद केली आहे.
महानगरपालिका शाळांध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातील असतात. शाळांमध्ये मुलींचे प्रमाण वाढावे, त्यांना शिकतांना कोणतीही अडचणी येऊ नये म्हणून मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १ ते १२ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या व ८० टक्केच्या वर उपस्थिती असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यींनीना थेट त्यांच्या खात्यावर प्रतिवर्षी ४ हजार रुपये पैसे जमा केले जाणार आहे. याकरीता महापालिकेच्या अर्थसंकल्पात २.१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.