- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

प्रविण तरडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिस स्टेशन यशोधरा येथे निवेदन

नागपूर :- प्रविण तरडे नामक इसमाने भारत देशाचे राष्ट्रीय प्रतीक असलेले भारताच्या संविधानाच्या प्रतीवर गणपती मुर्ती ठेवून भारतीय संविधानाचा अपमान केला आहे. शिवाय प्रविण तरडेने या अपमानजनक घटनेच्या फोटो काढून जानीव पुर्वक सोशल मिडीयावर पसरविला असुन ज्या संविधानामार्फत संपुर्ण देश चालतो अशा संविधानाचा अपमान केला असुन त्यामुळे संपुर्ण भारतातील जनतेचा व भारत देशाचा अपमन झाला.

त्याच्या या कृत्याने समस्त भारतीय नागरीकांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी त्याचेवर कायदेशिर कारवाही करून प्रविण तरडे विरूधद्द देशद्रोह करणे, भारतीय राष्ट्रीय चिन्हाचा/प्रतिकाचा अपमान करणे, जनतेच्या भावना दुखावने व आय.टी अॅक्ट नुसार तसेच योग्य त्या कलमान्वये गुन्हा नोंद करावा अशी मागणी भिमसंग्राम सामाजीक संघ चे नागपूर जिल्हा अध्यक्ष मा. जितेंद्र (लाला) मनोहर ससाणे यांनी केला.

निवेदनात सहभागी नागपूर शहर उपाध्यक्ष परितोष (मोनु) लाऊत्रे, शहर उपाध्यक्ष मोहित देसाई, उत्तर नागपूर अध्यक्ष संदिप चवरे, उपाध्यक्ष मनोज चव्हाण, विक्रम गजघाटे, बबलु गायकवाड, मुन्ना गजघाटे, समीर अली, विरेंद्र डोंगरे, सुभाष बागडे, राहुल भाऊ इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *