- Breaking News, नागपुर समाचार

वंचित बहुजन आघाडी चे डफली बजाओ आंदोलन

नागपूर : एस टी. महामंडळ ची बस सेवा शुरू करून दैनंदिन जिवन सुरळीत करावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष एड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात (आज) बुधवार ला हिंदी मोरभवन बस स्टाॅप, झांशी राणी चौक, नागपुर येथे डफली बजाओ आंदोलन करन्यात आले.

आजचे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका स्तरावर करन्यात आले. ज्यामधे जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. बाळासाहेब आंबेडकर यांनी नागपुर येथे स्वतः उपस्थित राहून आंदोलनाचे नेतृत्व केले. प्रसंगी जनतेला संबोधित करतांना बाळासाहेबांनी राज्य सरकार ला चांगलेच धारेवर धरले. महाराष्ट्र राज्य हे अगोदर दुसऱ्यांना निर्देशित करनारे राज्य होते पण आता हे दुसऱ्यांचे आदेश पाळनारे राज्य बनले आहे, सरकार प्राइवेट ट्रांसपोर्ट ला परवानगी देत आहे तर प्रायवेट ट्रांसपोर्ट मधील लोकांना कोरोना होत नाही मग सरकारी ट्रांसपोर्ट मधील लोकांनाच कोरोना कसा होनार हे शासनानं सांगावं असा घनाकाती प्रहार त्यांनी केला. सोबतच आजचे आंदोलन हे फक्त इशारा देन्यासाठी आहे, जनजिवन सुरळीत केलं नाही तर १५ ऑगस्ट नंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन करू असा इशारा सुध्दा यावेळी बाळासाहेबांनी दिला आहे.

प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे नागपुर शहर कार्यकारिणी, ग्रामीण कार्यकारिणी, युवक आघाडी, महिला आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन चे पदाधिकारी, पक्षाचे सर्व कार्यकर्ते व हजारों च्या संख्येने नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर नागपुर जिल्हा चे मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देन्यात आले, तेव्हा पक्षाचे प्रतिनिधि इंजि. राहुल वानखेडे, सुमेध गोंडाने, सुनिल इंगळे, अंकुश मोहिले, सिध्दांत पाटिल, सुमधू गेडाम, धर्मपाल लामसोंगे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *