- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : “जय विदर्भ पार्टीची वार्षिक सर्वसाधारण सभा पक्ष मुख्यालयात संपन्न“

“श्याम लुटे यांची युवा आघाडी नागपूर शहर अध्यक्ष पदी नियुक्ती”

नागपूर समाचार : जय विदर्भ पार्टीच्या वतीने आज दिनांक ५ मार्च २०२४ मंगळवार ला वार्षिक सर्वसाधारण सभा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीला ११ ही जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.  

बैठकीमध्ये पक्षांतर्गत विविध विषयांवर चर्चा घडवून आली ठराव पारित करण्यात आले त्याचप्रमाणे विदर्भातील १० ही लोकसभेच्या जागेवर इच्छुकांचे आवेदन मागविण्यात आले होते त्यावर विविध पदाधिकाऱ्यांनी आपले अर्ज निवडणूक समितीकडे सुपूर्द केले व पुढे ही काही इच्छुकांना अर्ज द्यायचे असतील तर त्यांनी मा. निवडणूक समिती अध्यक्ष या नावे जय विदर्भ पार्टी, २०६, “केदार विदर्भ भवन”, जे. बी. ठक्कर मार्ग, गिरीपेठ, नागपूर १० येथे पाठवावे असे अध्यक्ष अरुण केदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सभेला संबोधित केले. यावेळी श्याम लुटे यांची युवा आघाडी नागपूर शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

या सभेला पक्षाचे महासचिव विष्णू आष्टीकर, उपाध्यक्ष मुकेश मासुरकर, सहसचिव गुलाबराव धांडे, कार्यकारिणी सदस्य अरुण मुनघाटे, कृष्णराव भोंगाडे, सुदाम राठोड, निवडणूक समिती अध्यक्ष सुधा पावडे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष नसीर शेख, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अरुण जोग, चंद्रपूर शहर अध्यक्ष भूषण चीलके, नागपूर शहर अध्यक्ष अॅड. मृणाल मोरे, ज्योती खांडेकर सह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र सतई, प्रशांत तागडे, आनंद निखार यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन पक्षाचे उपाध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *