- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपूर/वाकी समाचार : बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या ८१ वा वार्षिक उर्स आजपासून

नागपूर/वाकी समाचार : श्री. क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या ८१ वा वार्षिक उर्स दि. ३ ते ९ मार्च २०२४ दरम्यान वाकी दरबार येथे साजरा करण्यात येत आहे.

दि.३ मार्च रोज रविवार ला परंपरेनुसार नागपूर येथील ताजबाग शरीफ इथून शाही संदल निघून प.पु.काशिनाथजी डहाके (पाटील) यांच्या वाकी येथील वाड्यात येईल. तेथून सायंकाळी ५.३० वा.ताजुद्दिन बाबा दरबारात पोहोचेल. परंपरेनुसार सज्जादा नशीन ज्ञानेश्वरराव डहाके (पाटील) यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात येईल. 

या वार्षिक उर्स चे उद्घाटन सायंकाळी ६ वाजता मा. सुनीलबाबू केदार माजी मंत्री यांच्या यांच्या अध्यक्षेखाली डॉ.अशोक जीवतोडे राष्ट्रीय समन्वय ओबीसी महासंघ, मा.मुक्ताताई कोक्कडे अध्यक्ष जि.प.नागपूर यांच्या प्रमुख उपस्थिततीमध्ये मा.सौ.अरुनाताई शिंदे सभापती पंचायत समिती सावनेर, प्यारे जिया खान अध्यक्ष ताजबाग ट्रस्ट नागपूर, ताज अहमद राजा सचिव ताजबाग ट्रस्ट नागपूर या मान्यवरांच्या उपस्थितीत पाहुण्यांच्या हस्ते महापूजा करून उर्स प्रारंभ होईल.

या उर्स कार्यक्रमादरम्यान दररोज मिलाद कव्वाली असे धार्मिक कार्यक्रम होईल ६ मार्च ला राजे रघुजीराव भोसले व राजे मोधोजीराव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कुल समारंभ कार्यक्रम होईल.

७ मार्च ला सकाळी १० वा. ह.भ.प. गणेश महाराज काळे आळंदीकर यांचे कीर्तन होईल. दि.८ मार्च ला दुपारी १२ वा.ऍड. मिलिंदजी केदार यांचे प्रवचन होईल.

 दि ९ मार्च ला सकाळी १० वाजता ह.भ.प.श्री.महंत पुरुषोत्तम दादा महाराज पाटील आळंदीकर यांचे गोपाल काल्याचे किर्तन होइल.या कार्यक्रमाला मा.आमदार मोहनजी मते मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहुन  उत्सवाचा समारोप होईल. 

उत्सवादरम्यान भाविकांनी नियमाचे पालन करूनच दर्शन घ्यावे. तसेच भाविकांनी कोठेही गर्दी करु नये असे आव्हान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकरराव डहाके (पाटील) यांनी भाविकांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *