- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपूर समाचार : शिवजयंती महोत्सव धूम धडाक्यात परिवर्तन चौकात सोमवारी

जी२० ची आठवण म्हणून बघा मानेवाडा चौक ते टाटा चौकापर्यंत सौ मंगला शेंशाक खेकरे यांच्या तर्फे – M२० बघण्यास विसरू नका 

नागपूर समाचार : शिव जन्मोत्सव समिती दक्षिण नागपूर (मानेवाडा) च्यावतीने अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यांच्या सुवर्ण इतिहासाची संस्कृती आणि शौर्याची गाथा सांगणारा हा महोत्सव शिवजन्मोत्सव समिती दक्षिण मानेवाडा तर्फे आयोजित करण्यात येत आहे. चला तर त्या सुवर्ण काळाचे स्मरणकरीत सुवर्ण क्षणाचे साक्षीदार म्हणून आपण सहभागी होऊन आनंद घ्यावा.

तसेच दक्षिण नागपूर येथील परिवर्तन चौकात बेसा रोडवर आयोजित कार्यक्रम सोमवार दिनांक 19 फेब्रुवारीला दुपारी 3 ते 10 या दरम्यान आयोजित केला आहे. यावेळी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले असून दुपारी 3 ते 6 या दरम्यान स्पर्धेला सुरुवात होईल. यामध्ये बाल कलाकारांसाठी वेशभूषा आणि महिलांकरिता वेशभूषा स्पर्धा ठेवलेली आहे. त्यामध्ये महिलांकरिता पहिले बक्षीस सोन्याची नथ आणि दोन, तीन, चार, पाच, असे परितोषिक म्हणून महिलांना पैठणी साडीचे वितरण केल्या जाईल.

त्यानंतर बाल कलाकांरांना वेशभूषे स्पर्धेत पहिलं बक्षीस 5001- दुसरे 3001 -तिसरे 2100 रुपये असे पारितोषिके दिल्या जाणार आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना प्रोत्साहन बक्षीसे दिल्या जाईल. कार्यक्रमा प्रारंभी सायंकाळी 7:00 वाजता. शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते केल्या जाईल.

तसेच दक्षिणचे लाडके आमदार मोहन भाऊ मते यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात शशांक खेकरे मित्र परिवारातर्फे तसेच माजी नगरसेविका सौ. मंगला खेकरे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन शंशांक खेकरे व मित्र परिवारांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *