- Breaking News, आंदोलन, नागपुर समाचार

वर्धा समाचार : अजनी -अमरावती -अजनी अप- डाऊन आणि अमरावती -जबलपूर -अमरावती अप-डाऊन एक्सप्रेस गाड्यांच्या थांबणार मिळणार लवकरच हिरवी झंडी

खासदार रामदासजी तडस यांनी दिले 100/% आश्वासन 

वर्धा समाचार : विद्यार्थी कामगार रेल्वे प्रवासी ग्रामस्थ यांनी आज दिनांक 13.02.24 ला सकाळी 10:00 वाजता खासदार रामदासजी तडस, वर्धा ऑफिस गाठले आणि संतप्त लोकांनी खासदारांना सवाल करणे चालू केले.

27 जानेवारी 2024 पासून तुळजापूर रेल्वे स्टेशन समोर बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे आणि तुम्ही अजुनही उपोषण स्थळाला भेट दिली नाही आणि उपोषणाला बसलेले विदर्भ राज्य आघाडी जिल्हाध्यक्ष रामकिशोर रामाजी शिगनधुपे यांच्या नेतृत्वामध्ये 25 गावातील विद्यार्थी ग्रामस्थ कामगार रेल्वे प्रवासी यांना मेल गाड्यांचा थांबा मिळावा म्हणून ते सतत पर्यंत्न शिल असुन आज दिनांक 13.02.24 ला उपोषणाला 19 दिवश पुर्ण होतं आहे.

आणि मेल गाड्यांचा थांबा मिळावा म्हणून सतत पाच वर्षापासून प्रर्यत्न करतं असुन आपण फक्त सहानुभूती पत्र देऊन समजूत काढतं आहे तुमच्या प्रमाणे रेल्वे प्रशासन शुद्धा करतं आहे.

संतप्त ग्रामस्थांनी खासदारांना विचारना केली आपण मेल गाड्यांचा थांबा द्या अन्यथा आम्ही सर्व 25 गावातील सरपंच ग्रामस्थ विद्यार्थी कामगार रेल्वे प्रवासी ऐणा-या 2024 च्या विधानसभा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकु ईतकेचं नाही तर तुम्हाला आमच्या भागात प्रवेश मिळणारं नाही.

ऐवढेच नाही तर 75 वर्षावरील वृद्ध म्हातारे आपल्या नातू पंतू साठी आत्मबली दान करणारं. सोबतच तुम्ही ऐक काम करा जे थांबे दिले आहे ते सर्व थांबे रद्द करा  आणि तुमची रेल्वे लाईन ईथुन उचला नाही तर आमच्या भागातील विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या साठी रेल्वे गाड्यांचे थांबने सुरू करा. आमच्या भागातील 25 गावातील विद्यार्थ्यांसाठी फक्त रेल्वे गाडीचं ऐकमेव साधन आहे. अशा संतप्त लोकांनी मोठ्या संख्येने 25 गावातील विद्यार्थी ग्रामस्थ कामगार रेल्वे प्रवासी व सरपंच यांनी खासदार यांना संबोधित केले.

खासदार रामदासजी तडस साहेबांनी ताबडतोब वेळ न घालवता GM मुंबई, रामकरण यादव यांच्या सोबत ध्वनी फोन करून चर्चा केली व विषयाची गंभीरता समजुन सांगीतली तसेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवी यांच्या सोबत ध्वनी फोन चर्चा वर केली.

18 फेब्रुवारी किंवा 19 फेब्रुवारी 2024 ला मी स्वतः दोन्ही मेल गाड्यांचा थांबा घेऊन तुळजापूर रेल्वे स्टेशन ला येतो आणि आंदोलनकारी रामकिशोर रामाजी शिगनधुपे यांना जुस पाजुन उपोषण सोडु आणि गाडीला हिरवी झंडी दाखु असे असे शिष्ठ मंडळाला सांगितले. सर्व शिष्ठ मंडळानी जोरात नारे घोषणा झाल्या गाड्यांचा थांबा मिळालाचं पाहिजे…आम्हाला न्याय मिळालाचं पाहिजे… 25 गावातील विद्यार्थी/ रेल्वे प्रवासी/ कामगार प्रवाशी यांना गाड्यांचा थांबा मिळालाचं पाहिजे…खासदार साहेब आगे बडो….असे जल घोषणा झाल्या.

यात रामकिशोर रामाजी शिगनधुपे विदर्भ राज्य आघाडी जिल्हाध्यक्ष वर्धा, मंगेश काकडे, किसान मुडे, सुनील जयस्वाल, आतिश घूडे, दिलीप ठाकरे, वैभव ताकसांडे, अजय राजूरकर, अनिल रूईकार, श्रीराम पाटील, कवडुजी घुडे, नाना कावळे, तातोबा चहांदे, धम्मज्योती शंभरकर,  अरुण आलोटकर, दिलीप पाटील, अरुण ऐसनकर, पंजाब वानखेडे, वाल्मिकी देशमुख, सागर भगत, शिवदास तामगाडगे, सुरेश कांबळे, तुकाराम पोहटे, गावकरी आणि शाळकरी विद्यार्थी उपस्थित आंदोलन चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *