- Breaking News, नागपुर समाचार, सामाजिक 

चंद्रपुर समाचार : समाजोत्थान तर्फे अंध अपंगांचा समाजोत्थान सत्कार

दिव्यांगांना भिक नको स्वयं रोजगार हवा

चंद्रपुर समाचार : समाजोत्थान अंधअपंग सामाजिक कल्याणकारी संस्था चंद्रपूर तर्फे दरवर्षी अंध अपंगांचा समाजोत्थान मेळावा घेतला जातो. या मेळाव्यात अंघ-अपंग विद्यार्थ्यांना शिषवृत्ती, स्वंय रोजगार करणाऱ्या अंध अपंग बांधवांना आर्थिक मदत व भेटवस्तूंचे वाटप केले जाते.

अंध अपंगांच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचे सत्कारही या मेळाव्यात केले जातात. या वर्षी हा कार्यक्रम रविवार दिनांक 11/02/2029 ला IMA सभागृह, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला. श्रीमती सुनंदा पुरी यांचे अंध अपंगासाठी केलेले एकंद्रीत कार्य लक्षात समाजोत्थांनी घेता मेळाव्यात त्यांचा सत्कार केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. धनंजय साळवे, मा. डॉ. सचिने बेधे व इतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सुनंदा ताई यांचा पुस्तक, रोपट भेटवस्तू व शॉल देवून सत्कार करण्यात आला. 

सुनंदा पुरी सत्काराला उत्तर देतांना म्हणाल्या की, दिव्यांगांचा योजनांचे लाभ दिव्यांगांनाच मिळायला पाहिजे आणि ग्रामीण भागात जाऊनही उपक्रम राबविले पाहिजे. दिव्यांगांना भिक नको स्वयं रोजगार हवा तसेच दिव्यांगांचा हक्कासाठी आढावा घेतला पाहिजे. “समुद्र से डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वालो की कभी हार नहीं होती.”

या कार्यक्रमात मा. श्री सुनिल दहेगांवकर, मा. डॉ. विद्याधर बनसोड, मा. श्री. ज्ञानेश्वरराव ठाकरे, मा. डॉ. सदानंद पाटीत, राजू साटेवार, डॉ. शशिकांत बेरशेट्टीवर सहित अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *