- Breaking News, नागपुर समाचार, मनोरंजन

मनोरंजन समाचार : अभिनेत्री डॉ.सृष्टी बाहेकर दिसणार एका नव्या भूमिकेत

झी टीव्ही च्या ‘शिवा’ मालिकेत ”दिव्या ‘ या भूमिकेत दिसणार

◾मालिका १२ फेब्रुवारी पासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता येणार आहे

मनोरंजन समाचार : डेंटिस्ट/ दंतवैद्य असलेली सृष्टीने इंडस्ट्री मध्ये प्रत्येक कलाकार जशी थिएटर पासून आपली सुरुवात करतो तशीच तिने देखील केली. नंतर ” इंडिया के मस्त कलंदर ” या कार्यक्रमात आपलं पदार्पण केलं. आपल्या कौशल्याच्या जोरावर, रोबो विक्रम सिंह या ॲक्ट पार्टनर सोबत तिने अंतिम फेरी पर्यंत मजल गाठली. त्यानंतर तिने “जय जय स्वामी समर्थ” या मालिकेत देव्यानीची भूमिका पटकावली. तिच्या या प्रवासात सोनी टीव्ही च्या “तुमची मुलगी काय करते” आणि” कारण गुन्ह्याला माफी नाही ” या मालिकेने अजून बहार आणली. त्यात ती बॉशंधरा हे पात्र साकारात असतांनाच आता झी मराठी या वहिनी वर पदार्पण करणारी “शिवा” या मालिकेत ती दिव्या च्या भूमिकेत दिसणार आहे. तिर्हाईत असून देखील; ध्यास, मेहनत, चिकाटी आणि कौशल्याच्या जीवावर सृष्टीने मराठी इंडस्ट्री मध्ये आपलं स्वतचं अस्तित्व निर्माण केलं. तिच्या पुढच्या प्रवासासाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *