- Breaking News, नागपुर समाचार, बाजार

नागपुर समाचार : नि:शुल्क निवासी, अनिवासी व तांत्रिक; उद्योजकता विकास प्रशिक्षण 5 फेब्रुवारीला

नागपूर समाचार : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व हिंगणा उपकेंद्र यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराप्रमाणे येथे वेगवेगळे नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण, निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण, अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण, तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण व निर्यात-प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन 5 फेब्रुवारीला करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमांतर्गत उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योगसंधी मार्गदर्शन, उद्योगाची निवड, प्रकल्प अहवाल तयार करणे, बाजारपेठ पाहणी, उद्योगासंबंधित विविध नोंदणी व परवाने, उद्योगांना भेटी, शासनाच्या व महामंडळाच्या विविध कर्ज योजनांची माहिती, स्टार्टअप इंडिया, स्टॅडअप इंडिया, मुद्रा योजना तसेच उद्योग उभारणीच्या संदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन केल्या जाईल.

इच्छूक उमेदवारांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याच्या दृष्टीने माहिती व मार्गदर्शनासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन 5 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह शासकीय आयटीआय समोर दीक्षाभूमी रोड नागपूर येथे आयोजित केले असून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा प्रकल्प समन्वयक पंकज ठाकरे मो.क्र. 8975506630 किंवा केंद्र प्रमुख तथा राज्य समन्वयक हेमंत वाघमारे मो.क्र. 7774036232 उपकेंद्र नागपूर यांच्याशी 3 फेब्रुवारीपर्यंत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *