- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती प्राथम्याने करा – डॉ. विपीन इटनकर

नागपूर समाचार : अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती प्राथम्याने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, परिविक्षाधिन अधिकारी(भा.प्र.से) कुशल जैन तर दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा व समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात 100 च्या वर अपघात प्रवण स्थळे आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी लागणारा निधी जिल्हा विकास निधीतून देण्यात येईल. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पोलीस विभाग व सार्वजनिक विभागाने समन्वयातून काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्ता सुरुक्षेबाबत नागपूर सुधार प्रन्यास व एनएमआरडीने ही मदत करावे व वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती करण्याचे त्यांनी सांगितले.

अपघातावर आळा घालण्यासाठी मोटार वाहन कायद्यांतर्गत हेल्मेट सक्तीचे करण्यात आले असून सिटबेल्ट बांधणे आवश्यक आहे. महामार्ग पोलीसांनी अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी गस्ती वाढवाव्यात, त्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार असून पोलीस अधीक्षक वाहन चालक उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुकर दळणवळणासाठी रत्यावरील वाहतूक नियमांचे चिन्ह रेखांकित करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक विभागाला दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *