हिंगणघाट समाचार : भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारी अध्यक्षपदी संजय माडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी ही नियुक्ती केली. आज दिनांक ३० रोजी आमदार समीर कुणावर यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार समीर कुणावार व भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी उपरोक्त नियुक्तीचे पत्र सोपविले. संजय माडे अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय असून त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची ताकद आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शहरात भाजपचे संघटन वाढण्यास मदत मिळणार आहे.

या नियुक्तीबद्दल संजय माडे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,आमदार समीर कुणावार, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांचे आभार मानले. याप्रसंगी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, भाजपा तालुका अध्यक्ष विनोद विटाळे, भाजपा शहर अध्यक्ष भूषण पिसे, माजी जिल्हा परिषद सभापती वसंतराव आंबटकर, तुषार आंबटकर, भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष छाया सातपुते, माजी पंचायत समिती सभापती गंगाधरराव कोल्हे , विठू बेनिवार विकी राऊत इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



