- Breaking News, खासदार क्रीड़ा महोत्सव, नागपुर समाचार

नागपुर समाचार : खासदार क्रीडा महोत्सव २०२४;  बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत अल्फीया शेख, मोहित यादव ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’

नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी नोंदवित अल्फीया शेख आणि मोहित यादव हे ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ ठरले.

गरोबा मैदान येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये महिला गटात अल्फीया शेख तर पुरूष गटात मोहित यादवने सर्वोत्तम कामगिरी केली. महिलांच्या 63 किलो वजनगटात अल्फीयाने सर्वाधिक 67.67 गुणांची नोंद करीत बाजी मारली. या वजनगटात सोनू सरोते आणि चंदा ओझा यांनी दुस-या व तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरूषांमध्ये 66 किलो वजनगटामध्ये मोहित यादवने सर्वाधिक 76.10 गुण नोंदवित ‘चॅम्पियन्स’चा किताब आपल्या नावावर केला. या गटात मॅक्झिमस दुस-या आणि मयूर टेकाडे तिस-या स्थानावर राहिला.

विविध वजनगटातील विजेत्यांना रोख पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याला स्पर्धेचे समन्वयक माजी नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, कन्वेनर सचिन माथने, माजी नगरसेविका कांता रारोकर, क्रीडा शिक्षक अविनाश सहारे, बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे आनंद डाबरे, लक्ष्मीकांत मेश्राम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *