- Breaking News, खासदार क्रीड़ा महोत्सव, नागपुर समाचार

नागपुर समाचार : खासदार क्रीडा महोत्सव २०२४; सेंट जोसेफ, विद्यानिकेतन थ्रोबॉलमध्ये अजिंक्य

नागपूर समाचार  : सेंट जोसेफ आणि विद्यानिकेतन संघाने प्रतिस्पर्धकांना पराभवाचा धक्का देत खासदार क्रीडा महोत्सवातील थ्रोबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. दिघोरी येथील बिरसा मैदानामध्ये गुरूवारी (ता.25) स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली.

मुली आणि मुलांच्या गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. मुलींच्या गटात सेंट जोसेफ आणि प्रोव्हिडन्स जी.एच. यांच्यात चुरशीची अंतिम लढत झाली. यामध्ये सेंट जोसेफ संघाने 15-7, 7-15, 15-9 असा सामना जिंकून जेतेपद पटकावले. मुलींच्या गटात तिस-या स्थानासाठी झालेल्या सामन्यात सेंट उर्सुला संघाने सीडीएस वर 15-12, 15-3, 15-10 ने विजय मिळविला.

मुलांच्या गटामध्ये विद्यानिकेतन संघाने ई-पाठशाला संघाचा 18-16, 15-9 ने पराभव करून विजेतेपदाचे चषक पटकावले. तर तिस-या स्थानासाठीच्या सामन्यात एसओएस संघाने सीडीएसचा 15-8, 15-4 असा एकतर्फी पराभव करून विजय मिळविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *