- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

हिंगणघाट समाचार : हिंगणघाट तालुक्यातील तसेच समुद्रपूर तालुक्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन

हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. दिनांक ०८ रोजी हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट तालुक्यातील पोहणा, ढीवरी पीपरी, सास्ती तसेच समुद्रपूर तालुक्यातील पारोधी व पिपरी येथील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.

सदर प्रवेश सोहळ्याचे आज दि. ०८ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी प्रामुख्याने जयवंत कुबडे, महेश नक्षीने, राजू झाडे, गोलू सकुलवार , दशरथ झाडे, प्रज्वल अंबाडरे, चंदू टापरे, संजय वानखेडे, राहुल चौधरी, किशोर शंभरकर, प्रमोद सोनटक्के, दिलीप डंभारे , टीकाराम अंबलकर, सुरेश ढाकणे, विनोद डंभारे, नामदेवराव डंभारे, सतीश सुर्वे, भोला निसाद, चंद्रास भोसले, प्रीतम शिंदे, मंगेश अंबादासजी राऊत, आकाश वाटे, निलेश पुरे, निलेश राऊत, पवन भादाडे , अविनाश वाटे, लिकेत राऊत , कार्तिक ठाकरे, हनुमान कोहळे, अमोल राऊत, रतन राऊत, अरुण टापरे, अक्षय टापरे, नचिकेत येरेकार, सुनील येरेकर, परमेश्वर वाघाडे, मंगेश वाघाडे, हरिदास वाघाडे, बंडू वाघाडे, शंकर अरदपायरे, रामजी वाघाडे, जयंत नेहारे, राजेश्वर नेहारे, बालाजी नेहारे ,उत्तम शेंद्रे, बंडू वाघाडे, देविदास येरकाडे, भोजराज दाते, मारुती वाघाडे, महादेव अरदपायरे, सुधाकर गौरकार, छगन इंगळे, किसना मानकर, विनोद राऊत, गजानन ढोरके, विश्वास घोडे  इत्यादी कार्यकर्त्यांना भाजपात रितसर प्रवेश देण्यात आला. उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचे वेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, भाजपा विधानसभा प्रमूख संजय डेहणे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष छाया सातपुते, हिंगणघाट तालुका भाजपा अध्यक्ष विनोद विटाळे, समुद्रपूर भाजपा तालुका अध्यक्ष वामन चंदनखेडे, समुद्रपूर माजी नगराध्यक्ष गजानन राऊत, माजी पंचायत समिती सभापती गंगाधररावजी कोल्हे , माजी पंचायत समिती सभापती योगेश फुसे, भाजपा हिंगणघाट शहर अध्यक्ष भूषण पिसे, कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर संचालक घनश्यामजी येरलेकर, समाजसेवक सुनील डोंगरे ,महिला विधानसभा प्रमुख नलिनी सयाम, अनिता मावळे , विकास इंगळे, रवींद्र लढी, ललित डगवार, उमेश कोल्हे इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते सदर पक्ष सोहळा कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *