- Breaking News, खासदार क्रीड़ा महोत्सव, खेलकुद , नागपुर समाचार

नागपुर समाचार : ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान द्वारा आयोजित खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचे आग्रहाचे निमंत्रण – नितिनजी गडकरी

नागपुर समाचार : प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात येणारा यंदाचा तीन दिवसीय खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव येत्या 19 ते 21 जानेवारी दरम्यान होऊ घातला आहे. रोज सायंकाळी 5.30 वाजता सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे होऊ घातलेल्या ह्या महोत्सवात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कलाकार सहभागी होणार आहेत.

19 जानेवारी रोजी केन्दीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होणार असून लगेच प्रख्यात गायक महेश काळे यांच्या भक्ती आणि भाव गितांचा कार्यक्रम आयोजित आहे.

20 तारखेला 5.30 वाजता कोकण कन्या बॅन्डचा लाईव्ह कान्सर्ट (बहारदार हिंदी चित्रपट गाण्यांचा कार्यक्रम) होईल. तर 21 जानेवारी रोजी प्रख्यात लेखक दिग्दर्शक कलावंत शेखर सेन यांचा तुलसी हा एकपात्री संगीतमय कार्यक्रम होणार आहे.  या तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमाला आपण आपल्या मित्रांसह आवर्जून उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती.

सांस्कृतिक महोत्सव, दिनांक – 19 ते 21 जानेवारी 2024, वेळा – रोज संध्याकाळी 5.30 वाजता, स्थळ – सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर

टीप – कार्यक्रमाच्या प्रवेश पत्रिका (पासेस) दोन तीन दिवसात येतील. आपणास तशी सूचना दिल्या जाईल. त्या आपण माझ्या घरून घेऊन जावे ही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *