- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : मुख्य निवडणूक अधिकारी यांनी घेतला मतदार नोंदणीचा आढावा

नागपूर समाचार : मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मुंबई येथून जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह निवडणूक विषयक विविध विषयांचा आढावा आज घेतला. आढावा बैठकीत नागपुरातून दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रवीण महिरे, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार सहभागी झाले होते.

 निधन झालेले मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरित मतदार, दुबार मतदार यांच्याबाबतीत नाव वगळणे, मतदारांच्या नाव, वय, पत्ता, फोटो यातील दुरुस्त्यांची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश श्री. देशपांडे यांनी दिले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मतदार नोंदणी गतीने होत आहे. नाव वगळणे, मतदारांच्या नाव, वय, पत्ता, फोटो यातील दुरुस्त्यांची कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *