ट्रक टँकर बस चालविणाऱ्या वाहन चालकांनी संप पुकारला
नागपुर समाचार : मागील दोन दिवसांपासून सोशल मीडिया मध्ये पेट्रोल पंप संचालकांचा संप सुरु असल्याच्या बातम्या सुरु आहे त्यामुळे सर्व पेट्रोल पंप वर प्रचंड गर्दी आहे. पेट्रोल पंप संचालकांचा कोणताही संप नाही. ट्रक, टँकर, बस चालविणाऱ्या वाहन चालकांनी संप पुकारलेला आहे त्यामुळे पेट्रोल पंप वर होणार पुरवठा खंडित झालेला आहे त्यामुळे अनेक पंप ड्राय झालेले आहे.
वाहन चालकांच्या संपाचे कारण….
भारतीय न्याय संहिता सुधारणा विधेयक भारत राजपत्र मा.महामहिम राष्ट्रपती यांच्या स्वाक्षरीने दिनांक २५/१२/२०२३ रोजी प्रकाशित झालेले आहे. हे सुधारणा विधेयक प्रकाशित झाल्यापासूनच याचा विरोध सुरु झाला आहे. या विरोधाचे प्रमुख कारण सोशल मीडिया द्वारे जाहीर केलेली अर्धवट माहिती आहे. या मुळे सर्व ड्रायव्हरच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या विधेयकामुळे झालेले मुख्य बदल खालील प्रमाणे आहे.
१) अपघातानंतर ड्राइवर गाडी सोडून पळाल्यास १० लाख रुपये दंड व १० वर्षे कारावास.
२) ड्राइवर ने अपघात झाल्यावर जखमी व्यक्तीला दवाखान्यात किंवा पोलीस स्टेशन ला
पोहचविल्यास ५ लाख रुपये दंड व ५ वर्षे कारावास
३) अपघातात कोणी मृत्युमुखी पडल्यास जामीन मिळणार नाही.
परंतु अपघात झाल्यास जवळपास असलेले लोक ड्रायव्हरला बेदम मारहाण करतात त्यामुळे ड्रायव्हरला तिथे थांबणे शक्य नाही. प्रकाशित राजपत्रामध्ये सर्व नियमांचा खुलासा झालेला नाही त्यामुळेच अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत. आमची शासनाला विनंती आहे कि त्यांनी या सर्व शंकाचे निरासन तात्काळ करावे. जो पर्यंत शंकाचे समाधान होणार नाही तोपर्यंत हा तिढा सुटणे शक्य नाही. आमच्या संघटने तर्फे सर्वाना विनंती आहे कि नागरिकांनी संयम पाळावा. प्रशासन, तेल विपणनं कंपन्या डीलर व वाहतूकदार पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.