- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपुर समाचार : ‘श्रीराम राम रघुनन्दन राम राम’ – रामरक्षा आणि मारुती स्तोत्र पठणात हजारो भक्तांचा सहभाग 

अक्षत कलशाचे ‘ जागर भक्तीचा ‘ मध्ये झाले पूजन

नागपुर : ‘श्रीराम राम रघुनन्दन राम राम’, ‘श्रीराम जय राम जय जय राम राम’ च्या गजराने ईश्वर देशमुख महाविद्यालायचा परिसर निनादला. रामराज्य स्थापन व्हावे, सुराज्य स्थापित व्हावे, जनकल्याण होऊन सर्वत्र सौख्य आणि शांतता नांदावी, असा संकल्प करून खासदार सांस्कृतिक महोत्सवात आज सकाळी ‘ जागर भक्तीचा’ अंतर्गत रामरक्षा आणि मारुती स्तोत्र पठणाचा कार्यक्रम आज रविवारी संपन्न झाला. हजारो राम भक्त, आबाल-ज्येष्ठानी कार्यक्रमाला उपस्थिती लावून सामूहिक पठणात राम नामाचा जागर केला.

योगगुरु रामभाऊ खांडवे, प्रतिभा दटके, मनीषा शेवाळकर, अमोल ठाकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाल प्रारंभ करण्यात आला. सोमू देशपांडे, श्रद्धा पाठक, कल्पना मानापुरे, कविता इंगळे, अविनाश घुशे, नंदा पाठक, प्रभुजी देशपांडे आदींची यावेळी उपस्थिती होती. ‘श्री राम जय राम जय जय राम’ हे भजन राम भाकरे यांनी सादर केले तर अपूर्वा घुशे यांनी आरती म्हटली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *