- नागपुर समाचार, विदर्भ

चिमूर समाचार : मास्क बांधून दिसले नाही तर नगर परिषद कर्मचारी करतात प्रत्येकी एका व्यक्ती कडून २०० रुपयांची पावती फाडून लूट

  • मास्क बांधून दिसले नाही तर नगर परिषद कर्मचारी करतात प्रत्येकी एका व्यक्ती कडून २०० रुपयांची पावती फाडून लूट
  • राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई ची वाहतूक पोलिसा ऐवजी चिमूर नगर परिषद नाकाबंदी करून करतात देखरेख
  • २०० रुपये घेऊन शासनाणे दिलेल्या साध्या मास्क चे वाटप
  • ओळखीच्या व्यक्तीला कोणतेही कारवाही न करता सोडून द्यायचे व खेळयातील लोकांना जबरदस्ती अडवायचे
  • विरोध केला तर नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा

चिमूर समाचार : आज संपूर्ण भारतात कोरोना कोविड – १९ या विषाणूजन्य रोगाची साथ सुरू आहे. याची लागण जनतेला होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी आदेश काढले कि जे व्यक्ती मास्क लावून गावात व शहरात फिरणार नाही त्यांना मास्क देऊन २०० रुपये प्रति व्यक्ती घेण्यात यावे।

राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई नगर परिषद कर्मचारी यांना नाका बंदी करून जनतेला अडवून बळजबरीने जनतेची वाहने अडवून त्यांच्याशी हुज्जत घालीत बोलणे अशी रचना कुठल्याही आदेशात नमूद नसतांना पुर्णतः बंद असलेल्या कार मध्ये सुद्धा काही कारणाने मास्क खाली केले असे सांगितले असतांना सुद्धा बळजबरीने २०० रुपयांची पावती फाडली जात आहे।

नगर परिषदेचे मुख्याधिकारी मुख्यालयी असतांना हा प्रकार सुरू आहे.राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई ची देखरेख आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक ( ट्राफिक ) पोलीस आहे. व पोलीस नसतांना महामार्गाची नाका बंदी करण्याची परवानगी दिली तरी कोणी असा प्रश्न जनता करीत आहे शासकीय कायद्यान्वये हे अयोग्य ठरल्यास वरिष्ठ अधिकारी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाही करेल काय ? अशी चर्चा संपूर्ण चिमूर शहरात व तालुक्यात रंगलेली आहे।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *