- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : नागपुरात 1461 रुग्ण, 329 वर उपचार सुरु तर 1091 रुग्णांची सुटी

नागपूर समाचार : नागपुरात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच असून, या संसर्गजन्य आजाराची लागण होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवार, 27 जून रोजी आणखी 21 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या आता 1423 इतकी झाली होती त्यात आज नव्या 19 रुग्णांची भर पडल्यामुळे आज ही संख्या 1461 इतकी झाली आहे. दरम्यान आज आणखी एक मृत्यू झाल्याने मृत्युसंख्या 24 इतकी झाली आहे. आतापर्यंत एकूण 1091 वर रुग्णांनी कोरोनावर मात करून ते त्यातून मुक्तही झाले आहेत. त्यामुळे आता सद्यस्थितीत 328 वर अँक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या नागपुरात

दररोज मोठय़ा संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसागणिक कोरोना लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढत होताना दिसून येत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जरी समाधानकारक असले तरी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणही वाढले आहे. शनिवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) च्या विषाणू प्रयोगशाळेमध्ये 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह मिळून आले. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) च्या प्रयोगशाळेतून 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. खासगी प्रयोगशाळेतून 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. यामध्ये माधवनगर येथील 56 वर्षीय पुरुष व वर्धमाननगर येथील 31 वर्षीय पुरुषासह आणखी एकाचा समावेश आहे. तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) च्या प्रयोगशाळेमध्ये 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह मिळून आलेत. यामध्ये मॉरिस कॉलेज विलगीकरण कक्षातील 1, रामटेक नगरधन येथील 1 व सतरंजीपुरा येथील 2 जणांचा समावेश आहे. या 21 जणांसह आता शहरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1423 वर पोहोचली आहे. यापैकी 1091 जण कोरोनामुक्तही झाले आहेत.

मेयो आणि मेडिकलमधून 23 जणांना सुटी

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) तून शनिवारी 10 जणांना कुठलेही लक्षणे नसल्याने सुटी देण्यात आली. यामध्ये खैरी कामठी येथील 28, 47, 42 वर्षीय पुरुष, वानाडोंगरीतील 53 वर्षीय पुरुष, नाईक तलाव येथील 13 वर्षीय मुलगा, 77 वर्षीय वृद्ध, लष्करीबाग येथील 41 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, हंसापुरीतील 21 वर्षीय तरुणी, क्रिष्णा टॉकीजवळील 5 वर्षीय मुलगा. मेडिकलमधून 13 जणांना सुटी देण्यात आली. यामध्ये वानाडोंगरी येथील 14, 12 वर्षीय मुलगी, 60, 35 वर्षीय महिला, अमरनगर येथील 4 वर्षीय मुलगी, 30, 23, 32 वर्षीय महिला, 6 वर्षीय मुलगा, रामेश्‍वरी येथील 33 वर्षीय महिला, खापरखेडा येथील 47 वर्षीय पुरुष, अमरावती येथील 64 व 65 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. या 23 जणांसह आता शहरातील कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या 1091 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील 13 पैकी 10 तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

आजवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांपैकी हिंगणा, काटोल, कळमेश्‍वर, सावनेर, नरखेड, नागपूर (ग्रा.), कामठी, उमरेड, पारशिवणी याच तालुक्यातून कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. तर मौदा, कुही, भिवापूर व रामटेक या तालुक्यात एकही बाधित आढळून आला नव्हता. परंतु शनिवारी रामटेक तालुक्यातील नगरधन येथून एक बाधित रुग्ण पुढे आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील 13 पैकी 10 तालुके हे कोरोनाच्या विळख्याखाली आले आहेत. ग्रामीण भागातून आजवर 179 बाधित रुग्ण मिळून आले असून, यापैकी 103 रुग्ण बरेही झाले आहेत. तर हिंगण्यातील 2 जणांचा मृत्यूही झाला आहे. तर 74 रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *