- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : सेमिनरी हिल्स येथील बालाजी मंदिरात बालाजी ब्रम्होत्सव आणि स्कंध महोत्सवाचे आयोजन

नागपूर समाचार : सेमिनरी हिल्स येथील बालाजी मंदिरात ३१ आॅक्टोबर ६ नोव्हेंबरपर्यत बालाजी ब्रम्होत्सव आणि १२ ते १९ नोव्हेंबरपर्यत स्कंध महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मोतीबाग श्री स्कंध समाज व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेेश अग्रवाल यांनी पत्रपरिषदेत दिली. बालाजी ब्रम्होत्सव म्हणजे बालाजीचा विवाह सोहळा तर स्कंध महोत्सव म्हणजे कार्तीकेय विवाह सोहळा असतो.

या उत्सव काळात आयोजित झुला उत्सव हा भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र असतो. श्री बालाजी आणि श्रीदेवी तसेच कार्तीकेय आणि भूदेवीसह श्रीवल्ली व देवसेनेला सजवले जाते. या दरम्यान बालाजीला दुग्धाभिषेक करण्यात येईल. या शिवाय होमहवन, यज्ञयाग, नित्य पूजा, भजन, आरती, दीप पूजा, हळदी कुंकु आदी कार्यक्रम घेण्यात येईल. या उत्सवात ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत रोजी लक्ष्मीला विशेष अभिषेक तर ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ९.३० या वेळेत बालाजी कल्याण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाचे आकर्षण असलेली दीप पूजा ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता महिलांतर्फे दीप पूजा तर सायंकाळी हळदीकुंकुवाचे आयोजन केले आहे. या संपूर्ण महोत्सवासाठी खास दक्षिणेतून पूजारी येणार आहे. यावेळी उपाध्यक्ष बी. के. अग्रवाल, सचिव सत्यमूर्ती कन्नन, कोषाध्यक्ष अॅड. एस. विश्वनाथन, सहसचिव एस. विश्वनाथन आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *