- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : टूरिझम मलेशियाने भारतात दुसरा रोड शो आयोजित केला

नागपूर समाचार : टूरिझम मलेशियाने 14 ते 26 ऑगस्ट 2023 या कालावधीत सहा द्वितीय श्रेणीतील शहरांमध्ये या वर्षी भारताचा दुसरा रोड शो सुरू ठेवला आहे. या रोड शोची सुरुवात अमृतसर शहरात झाली आणि त्यानंतर लखनौ, नागपूर, पुणे, गोवा आणि कोचिन येथे झाली आहे.

टूरिझम, आर्टस् आणि कल्चर डेप्युटी मिनिस्टर वायबी तुआन खैरुल फिरदौस अकबर खान यांच्या अध्यक्षतेखाली, रोड शोमध्ये हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स, ट्रॅव्हल एजंट्स, टूरिझम उत्पादनांचे मालक, व्हिसा सल्लागार, मलेशिया-आधारित एअरलाइन्स आणि स्टेट टूरिझम बोर्डचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या 45 स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला आहे. 30 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधीत भारतातील पाच प्रमुख शहरांमध्ये झालेल्या पहिल्या यशस्वी रोड शोनंतर, तसेच अलीकडेच साऊथ एशिया ट्रॅव्हल अँड टुरिझम एक्सचेंज (एसएटीटीइ) 2023 आणि उदयपूर येथील ट्रॅव्हल वेडिंग शो मधील सहभागासह, टूरिझम मलेशिया या दुसऱ्या सिरीजद्वारे देशात आपल्या प्रचारात्मक प्रयत्नांचा आणखी विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठेवते. दोन आठवड्यांचा हा रोड शो नेटवर्किंग कार्यक्रमांनी भरलेला आहे ज्यामध्ये बिझनेस-टू-बिझनेस (बी २ बी) सेशन्स, सेमिनार आणि लग्न, गोल्फ, चित्रीकरण आणि खरेदी यांसारख्या विशिष्ट विभागांच्या जाहिरातींवर भर देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त रोड शो, 2026 मध्ये होणार्या् पुढील अपेक्षित व्हिझिट मलेशिया ईयरवर प्रकाश टाकण्यासाठी टूरिझम मलेशियासाठी एक व्यासपीठ म्हणून देखील काम करते. या वर्षी, मलेशियाचे सध्या 16.1 दशलक्ष आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आगमनाचे लक्ष्य आहे ज्यामध्ये आरएम 49.3 अब्ज टूरिझम प्राप्ती आहेत. मलेशियामध्ये पर्यटकांच्या आगमनात योगदान देणार्यां अव्वल देशांमध्ये भारत अजूनही कायम आहे. 2022 मध्ये, मलेशियाने एकूण 324,548 भारतीय पर्यटकांचे स्वागत केले, तर 2023 च्या पहिल्या तिमाहीत मलेशियामध्ये 164,566 भारतीय पर्यटक आले होते, जे मागील वर्षी याच कालावधीत 13,370 होते. सध्या, मलेशिया एअरलाइन्स, बाटिक एअर, एअरएशिया आणि इंडिगो द्वारे भारत आणि मलेशिया दरम्यान दर आठवड्याला 30,032 सीट्ससह 158 फ्लाइट आहेत. भारतीय पर्यटक आता मलेशियाच्या eVISA मल्टिपल एंट्री व्हिसासाठी (MEV) https://malaysiavisa.imi.gov.my/evisa/evisa.jsp द्वारे अर्ज करू शकतात. 

मलेशिया टुरिझम बद्दल

मलेशिया टुरिझम प्रमोशन बोर्ड, ज्याला टूरिझम मलेशिया असेही म्हणतात, ही मलेशियाच्या टुरिझम, आर्ट आणि कल्चर मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एजन्सी आहे. हे मलेशियाला एक पसंतीचे टुरिझम स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्याच्या विशिष्ट कार्यावर लक्ष केंद्रित करते. त्याच्या स्थापनेपासून, ते आंतरराष्ट्रीय टुरिझम दृश्यात एक प्रमुख खेळाडू म्हणून उदयास आले आहे. अधिक माहितीसाठी, टुरिझम मलेशियाच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब आणि टिकटोक वरील सोशल मीडिया अकाउंटला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *