- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी नागपुर चे आकाश मडावी

नागपूर समाचार : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली ही भारत सरकार मान्य संघटनेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्ष पदी लकीभाऊ जाधव यांची नुकताच बिनविरोध निवड करण्यात आली.ही निवड संघटने चे राष्ट्रीय अध्यक्ष सोमजीभाई दामोर, कार्याध्यक्ष मधुकरराव पिचड, उपाध्यक्ष फग्गनसिह कुलस्ते, उपाध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी केली. जुन १८ ला राज्य स्तरीय कार्यकारणी बैठकीचे आयोजन लकीभाऊ जाधव राष्ट्रीय युवा अध्यक्ष यांनी नाशिक येथे केले. क्रांतिसुर्य महामानव बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट देवुन लकीभाऊ यांना नागपुर तर्फ़े शुभकामना दिल्या गेल्या.

लकीभाऊ यांच्या नियुक्ति ने संपूर्ण भारतातील आदिवासी समाज बांधवांना न्याय मिळेल असे आकाश मडावी यांनी आपल्या भाषनात बोलले. नाशिक येथिल बैठकीत राष्ट्रीय युवा निरीक्षक म्हणुन नीरज चौव्हान, महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष गणेश गवळी, राज्याचे कार्याध्यक्ष आकाश मडावी, महासचिव दारासिंग पावरा, विदर्भ अध्यक्ष संतोष आत्राम, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रामा पथवे यांची निवड करण्यात आली.

सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक योजनांचा लाभ आदिवासी समाज बांधवांना मिळवुन दैण्याचे कार्य आकाश मडावी करतील अशी त्यांनी ग्वाही दिली. आकाश मडावी यांच्या नियुक्ति ने महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या बांधवांना एक ऊर्जा निर्माण झाली आहे.मध्यप्रदेश चे राज्यपाल यांचे विधि सहायक विक्रांत सिंग कुमरे, नागपुर माजी महापौर संदीप जोशी, समाज सेवक विवेक नागभीरे व सर्व कार्यकर्ता यांनी आकाश मडावी यांना नियुक्ति बद्दल शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *