- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : मनपाच्या नाम निर्देशित नगरसेवकांना प्रमाणपत्र वितरित

नागपूर समाचार : महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते सत्ता पक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर व विरोधीपक्ष नेते श्री. संजय महाकाळकर यांच्या उपस्थितीत मनपाचे नामनिर्देशित नगरसेवक यांना निर्वाचन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 

यात श्री. सुबोध आचार्य, श्री. देवेंद्र मेहर, श्री. विनोद बघेल, श्री. जितेंद्र ठाकूर, श्री. संजय ठाकरे, श्री. रितेश गावंडे (सर्व भाजप) व शिवसेनेचे श्री. सूरज गोजे यांच्यासह काँग्रेसचे सदस्य म्हणून श्री. केतन ठाकरे व श्री. अतुल कोटेचा यांचा समावेश आहे. सर्व नवनियुक्त सदस्यांचे महापौरांनी अभिनंदन केले. यावेळी मनपाचे इतर नगरसेवक उपस्थित होते.