- Breaking News, खेलकुद , नागपुर समाचार

नागपूर बाजार पत्रिका : रेशीमबाग जिम्नॅस्टिक मंडळातील उन्हाळी प्रशिक्षण शिबीरला उत्कृष्ट प्रतिसाद

नागपुर समाचार : रेशीमबाग जिम्नॅस्टिक मंडळातील 17 एप्रिल ते 31 मे 2023 या दरम्यान नुकत्याच झालेल्या उन्हाळी प्रशिक्षण शिबीरात अनेक मुलांनी सहभाग घेतला व त्याचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये जास्तीत जास्त मुलां-मुलींनी सहभाग घेतला होता मंडळाचे मुख्य प्रक्षिशिक निखिल कोमेजवार व अंकित देशमुख आणि सहाय्यक प्रशिक्षक मन मसराम व मेघा पानतावने यांनी मार्गदर्शन केले.

तसेच या शिबिराच्या समारोप समारंभाच्या वेळेस मुख्य अतिथी म्हणून आंतर राष्ट्रीय प्रशिक्षक अश्विनी ताडूलवार, मुख्य प्रशिक्षक गोपालन स्टेडियम, बंगळूर यांच्या हस्ते या शिबिरांचे समारोप संपन्न झाले. आणि या सर्व खेळाडूंचे नागपूर जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष आ.अनिल सोले व महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक संघटनेचे सहसचिव दीपक बारड यांनी पुढच्या वाटचालीसाठी मुलांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *