- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

नागपूर समाचार : भाजपा प्रभाग ३१ द्वारे गडकरींच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी महाआरोग्य शिबिराचे आयोजन

नागपूर समाचार : भारतीय जनता पार्टी प्रभाग ३१ द्वारे केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील नागरिकांसाठी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात शालिनीताई मेघे हॉस्पिटल द्वारे भव्य महाआरोग्य रोगनिदान शिबीराचे आयोजन शनिवार १३ मे रोजी सकाळी ८-२ या वेळेत श्री सैतवाल जैन संघटन मंडळ, ग्रेट नागरोड, नागपूर येथे करण्यात आले. हे आरोग्य शिबिर दक्षिण नागपूरचे आमदार श्री मोहनजी मते यांच्या मार्गदर्शनात होत असून या शिबिरात उदघाटन भाजप प्रदेश अध्यक्ष मा चंद्रशेखरजी बावनकुले याचे हस्ते तर अध्यक्षस्थानी भाजप शहर अध्यक्ष आमदार प्रविणजी दट्के राहतील.

प्रमुख अतिथी म्हणून डॉ रामदास आंबटकर, श्री संदीपजी जोशी, , संजयजी भेंडे, देवेनजी दस्तुरे, डॉ उपेंद्रजी कोठेकर, श्री गिरीशजी व्यास, श्री भोजराजी दुंबे, डॉ गिरीशचारडे, सौ ज्योतीताई देवघरे, आदी मान्यवर उपस्थित राहतील.

शिबिरात शालिनीताई मेघे हॉस्पिटल द्वारे नेत्र तपासणी, जनरल सर्जरी,दंत तपासणी, हृदयरोग , न्यूरोलॉजी, युरोलॉजी, कॅन्सर, अस्थिरोग, मधुमेह, स्त्रीरोग, पोटाचे , श्वसनाचे विकार, बालरोग, तसेच नागरिकांसाठी मोफत ईसीजी, बीपी, ब्लड शुगर, पैथोलॉजी टेस्ट करण्यात येतील. या शिबिराचे संयोजक श्री चंद्रकांत खंगार, श्री गुद्डू गुप्ता असून शिबिराचे नियोजन डॉ श्रीरंग वराडपांडे, श्री अश्विन रडके यांचे असून या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिवन डवले, महेश महाडिक, चंद्रकांत धांडे, नितीन सिमले, सौ गिता ईल्लुरकर,सौ सोनाली घोडमारे, सौ चेतना सातपुते सौ बेबीनंदा जैस,आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहे. तरी आपण नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *