- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

हिंगणघाट समाचार : आ. समिर कुणावार यांचे उपस्थितीत तुळजापुर, वघाळा येथील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

हिंगणघाट समाचार : आ. समिर कुणावार यांचे कुशल नेतृत्वाखाली हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.

दिनांक १२ रोजी हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी विधानसभा क्षेत्रातील हमदापुर सर्कलमधील युवा कार्यकर्त्यांनी आ.कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील चहुमुखी विकास पहाता त्यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.

आज दि.१२ मे रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हमदापुर सर्कल मधील तुळजापूर वघाळा येथील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये रीतसर प्रवेश देण्यात आला, यात प्रामुख्याने जयंत जिकार, विनोद झाडे , बंडू लढी, गणेश कोल्हे, गोविंदा पोपटकर, हेमंत जीकार , सुरज पोपटकर, सौरभ पोपटकर, शुभम पोपटकर, शरद झाडे, दीपक झाडे, रतन पोपटकर, प्रशांत कावळे, सचिन येडे या युवा कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

सदर कार्यक्रमाचेवेळी कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे, कंत्राटदार अभय मॅडमवार, भाजपा तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे, बालु इंगोले, गोपाळ वंगळ, रवी दांडेकर, शंकर मुंजेवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *