
नागपूर समाचार : हिंदी साहित्य विश्वातील अजरामर लेखक मुंशी प्रेमचंद यांची अतिशय लोकप्रिय हिंदी कादंबरी ‘गबन’ चा ज्येष्ठ बहुभाषीक साहित्यिक व साहित्य विहार संस्था अध्यक्ष आशा पांडे यांनी मराठीत अनुवाद केला आहे. या अनुवादित ‘गबन’ कादंबरीचा प्रकाशन समारंभ मंगळवारी, 31 जानेवारी रोजी सायं. 5.45 वाजता नवदृष्टी सभागृह, बी. आर. ए. मुंडले शाळा,दक्षिण अंबाझरी रोड येथे आयोजिण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रेष्ठ समीक्षक, लेखक डॉ. वि. स. जोग राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी हिंदी विश्व विद्यालय, वर्धा चे कुलपती डॉ. रजनीशकुमार शुक्ल यांची उपस्थिती राहिल. लोकव्रत प्रकाशन, पुणे चे सचिव शिरीष कुलकर्णी आणि राज्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र शासन राहुल पांडे यांची देखील विशेष उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रगती वाघमारे करतील. लोकव्रत प्रकाशन, पुणे आणि मुंबई तर्फे प्रकाशन समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.