- Breaking News

नागपुर समाचार : आंतरराष्‍ट्रीय दर्जाचा म्‍युझिकल फाउंटेन; नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते फार्मा सीईओचा सत्‍कार 

नागपुर समाचार ‍: म्युझिकल फाउंटेन अँड लाईट बघण्‍यासाठी आतापर्यंत सिंगापूर, दुबईसारख्‍या ठिकाणी जावे लागत होते. पण आता नागपुरातच असा आंतरराष्‍ट्रीय दर्जाचा म्‍युझिकल फाउंटेशन झाला असून त्‍याचे संपूर्ण श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाते अशा शब्‍दात 72 व्‍या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेससाठी देशविदेशातून नागपुरात आलेल्‍या विविध फार्मा कंपनीच्‍या सीईओ, विविध संस्‍थांच्‍या अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष व इतर पदाधिका-यांनी कौतुक केले. 

इंडियन फार्मास्‍युटिकल कॉंग्रेस असोसिएशन व फार्मास्‍युटिकल्‍स सायन्‍स विभाग, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्‍या संयुक्‍तवतीने आजपासून तीन दिवसीय आयपीसी-2023 ला प्रारंभ झाला. कांग्रेसच्‍या उद्घाटन नागपुरात आलेल्‍या फार्मा क्षेत्रातील दिग्‍गजांनी शुक्रवारी सायंकाळी फुटाळा तलावावरील म्‍युझिकल फाउंटेन अँड लाईट शोचा आनंद घेतला. 

एसीजी ग्रुपचे अध्‍यक्ष डॉ. अजित सिंग, भारत बायोटेकचे अध्‍यक्ष व कोव्‍हॅक्‍सीनचे निर्माते डॉ. कृष्‍णा इला, सिपेक्‍स इनकॉर्पोरेशनेचे सीईओ प्रदीप गद्रे, ऑल इंडिया केमिस्‍ट अँड ड्रगिस्‍ट असोसिएशनचे अध्‍यक्ष अप्‍पाजी शिंदे , ब्‍ल्‍युक्रॉस लिमिटेडचे सीईओ डॉ. आशीष शिरसाट, प्रसिद्ध गायक जावेद अली यांच्‍यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्‍थ‍ित होते. खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीच्‍यावतीने आयोजित या शोमध्‍ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते जावेद अली व इतर सर्व फार्मा सीईओ, अध्‍यक्ष व उपाध्‍यक्षांचा यावेळी सत्‍कार करण्‍यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *