- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ

गोंदिया समाचार ‍: संतांच्या सहवासातुन व विचारातून माणूस प्रगल्‍भ होतो – सुधीर मुनगंटीवार

पु. बाबांनी आध्‍यात्‍मा बरोबर सामाजिक कार्य सुध्‍दा मोठया प्रमाणात केले

गोंदिया समाचार : पुजनीय संत लहरीबाबा यांच्‍या जन्‍मशताब्‍दी सोहळयात प्रमुख अतिथी म्‍हणून उपस्थित राहता आले हे मी माझे भाग्‍य समजतो. संतांच्‍या सहवासातुन व विचारातून माणूस प्रगल्‍भ होतो असे विचार राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा गोंदिया जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केले. राजु-याचे माजी आमदार व संत लहरीबाबांचे भक्‍त अॅड. संजय धोटे यांनी मला इथे आमंत्रीत केले त्‍यामुळे मला संत लहरीबाबांविषयी माहिती झाली त्‍याबद्दल अॅड. धोटे यांनाही धन्‍यवाद !

संत लहरीबाबा यांच्‍या जन्‍मशताब्‍दी निमीत्‍त कामठा (ता. गोंदिया) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍यामध्‍ये पु. संत लहरीबाबा यांनी आपल्‍या आयुष्‍यात वापरलेल्‍या वस्‍तुंचे संग्रहालय उभे करण्‍यात आले आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन ना. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते झाले. या देशात मी जन्‍म घेतला हे मागील हजार जन्‍मांचे पुण्‍य असेल असे उद्गार ना. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी काढले. या देशात धनापेक्षा त्‍यागाची व सेवेची पूजा केली जाते. सर्व संतांनी वाईट गोष्‍टींचा त्‍याग करून चांगल्‍या गोष्‍टी आत्‍मसात कराव्‍या असा उपदेश नेहमी केलेला आहे व त्‍या प्रमाणे त्‍यांचे आचरण राहिलेले आहे. त्‍यामुळे अशा जागेवर आल्‍यावर एक प्रकारची प्रसन्‍नता मनात निर्माण होते. ना. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी परिसरातील मंदीरे, पु. लहरीबाबांचे समाधीस्‍थळ यांचे दर्शन घेतले.

याप्रसंगी श्री लहरी आश्रम संस्‍थेचे अध्‍यक्ष गोपाल बाबाजी, संस्‍थेचे मुख्‍य मार्गदर्शक डॉ. खिलेश्‍वरजी उर्फ तुकडया बाबाजी, तिरोड्याचे विधानसभा सदस्‍य आ. विजय रहांगडाले, भाजपाचे गोंदिया जिल्‍हाध्‍यक्ष केशवराव मानकर, कार्यक्रमाचे समन्‍वयक अॅड. संजय धोटे, संस्‍थेचे सचिव बावनथडे, नंदकिशोर सहारे, अॅड. अनिल ठाकरे, संजय तराळ, डॉ. संजय दानव, मते, अरूण मते, कुरमभट्टी, सतिश धोटे, वाघाडे संस्‍थेचे सर्व पदाधिकारी व पु. बाबांचे हजारों भक्‍त उपस्थित होते. यावेळी डॉ. खिलेश्‍वरजी, आ. विजय रहांगडाले यांनीही आपले विचार व्‍यक्‍त केले. प्रास्‍ताविक अॅड. संजय धोटे यांनी केले.

यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले की, आध्‍यात्‍मीक विचारांनी चालणा-या व्‍यक्‍तीचे मन शुध्‍द व निर्मळ असते व हे केवळ सद्गुरूंच्‍या सानिध्‍यातच शक्‍य आहे. पु. बाबांनी आध्‍यात्‍मा बरोबर सामाजिक कार्य सुध्‍दा मोठया प्रमाणात केले. ज्‍यामुळे समाजातुन कुरीती व कुप्रथा यांचे उच्‍चाटन होण्‍यास मदत झाली व आजही होते आहे. त्‍यांच्‍या पश्‍चात हे कार्य आदरणीय गोपाल बाबाजी व आदरणीय तुकडया बाबाजी हे यशस्‍वीपणे चालवित आहेत व सर्व भक्‍तांची त्‍यांना उत्‍तम साथ लाभत आहे असे इथे आल्‍यावर लक्षात येते. यापुढे या संस्‍थेला कुठलीही मदत लागल्‍यास मी पूर्ण शक्‍तीनिशी संस्‍थेच्‍या पाठीशी उभा राहील अशी ग्‍वाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *