डॉ. सुरुची डबीर यांच्या ग्रंथास राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
नागपूर समाचार : डॉ. सुरुची डबीर लिखित “संस्कृत महाकाव्यतील प्रतिमासृष्टी” या ग्रंथास साहित्य विहार संस्थेच्या प्रज्ञा शिवलकर स्मृती उत्कृष्ट समीक्षा ग्रंथ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या ग्रंथात संस्कृत साहित्यातील महाकवी भारवी, माघ आणि श्रीहर्ष तीनही महाकवींच्या प्रतिमांचे आंग्ल कवी टेनिसन ,जॉन किट्स, पॉल डुनबार आणि रवींद्रनाथ टागोर या कवींच्या प्रतिमांशी तुलनात्मक अध्ययन केले आहे.
साहित्य विहार संस्था नागपूर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच सृजन साहित्य संमेलन पार पडले. यात संमेलनाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, सुप्रसिद्ध साहित्यिक समीक्षक डॉ. वि. स .जोग आणि ज्येष्ठ साहित्यिक आशाताई पांडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
फोटो कप्शन : डॉ. सदानंद मोरे , डॉ. वि.स.जोग, डॉ. सुरुची डबीर