- Breaking News, नागपुर समाचार

ग्रामपंचायत चुनाव : ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद

ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद

ग्रामपंचायत चुनाव : जिल्ह्यातील 237 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा पूर्व दिवस (17 डिसेंबर) मतदानाचा दिवस (18 डिसेंबर) आणि मतमोजणी (20 डिसेंबर) रोजी तालुकास्तरावर होणार आहे. यादरम्यान ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील दारू विक्री बंद असणार आहे.

जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील 10, कळमेश्वर 23, कामठी 27, काटोल 27, कुही 4,मौदा 25, नागपूर (ग्रामीण) 19, नरखेड 22, पारशिवनी 22, रामटेक 8, सावनेर 36, उमरेड 7, हिंगणा 7 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत.

मतदानापूर्वीचा एक दिवस (17 डिसेंबर), मतदानाचा दिवस 18 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस प्रत्यक्ष मतदान होत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व मद्य विक्री बंद राहील, तर मतमोजणीच्या दिवशी 20 डिसेंबर रोजी मतमोजणीचा अंतिम निर्णय घोषित होईपर्यंत मद्य विक्री बंद राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अज्ञुनप्ती धारकाविरुद्ध नियमानुसार सक्तीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *