- Breaking News, नागपुर समाचार

विदर्भ समाचार : संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाला १ हजार रुपये बोनस द्या खा. प्रफुल पटेल यांची मागणी

मागील वर्षी धानाला बोनस देण्याचे आश्वासन पूर्ण केले – आश्वासन देऊन विसरुन जाणार्‍या पैकी आम्ही नाही

विदर्भ समाचार : आज पवनी तालुक्यातील ग्राम अड्याळ येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत गणेश सभागृह, अड्याळ येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न झाली. परिसरातील कार्यकर्ता व नागरिकांनी श्री पटेल यांच्या सोबत आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या संबंधी व विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली. 

या प्रसंगी खासदार श्री प्रफुल पटेल म्हणाले की, आश्वासन देऊन विसरुन जाणार्‍या पैकी आम्ही नाही,जे बोलतो ते पुर्ण करतोच महाविकास आघाडी सरकारच्या काळात धानाला बोनस देण्याचे आश्वासन आम्ही दिले होते व शेतकऱ्यांना बोनस देऊन दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासणारे फक्त आम्हीच आहोत असे खोटे आश्वासन देणाऱ्या विद्यमान शासनाने संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देत धानाला प्रतिक्विंटल १ हजार रुपये बोनस जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांचा उत्पादीत धान बाजारपेठेत आला असून खाजगी व्यापाऱ्यांना कमी किमतीत विकावा लागत आहे. हि बाब लक्षात घेता शासकीय धान खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्यात यावे. प्रति एकरी २० क्विंटल धान खरेदीची मर्यादा वाढवण्यात यावी. भंडारा व गोदिया जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, परतीच्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अन्यथा शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे श्री प्रफुल पटेल म्हणाले.

खा. श्री प्रफुल पटेल पुढे म्हणाले की, या भागाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील आहोत. परिसर सुजलाम सुफलाम व्हावा याकरिता नेहमी विचार केला आहे. गोसे खुर्द प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध होतील. गोसे खुर्द प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त पुनर्वसनासाठी २०१२ ला संपुआ सरकारच्या काळात आम्ही १२०० करोड रुपयांचा पॅकेज दिला होता. गोसे खुर्द धरणाला भरघोष निधी उपलब्ध होऊन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा याकरिता राष्ट्रीय प्रकल्प घोषित केले. पण विद्यमान केंद्र सरकारने राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा काढून घेतला आहे.

यावेळी खासदार श्री प्रफुल पटेल सोबत कार्यक्रमात सर्वश्री राजेंद्र जैन, नानाभाऊ पंचबुध्दे, मधुकर कुकडे, राजुभाऊ कारेमोरे, सुनिलभाऊ फुंडे, पंढरी सावरबांधे, धनंजय दलाल, यशवंत सोनकुसरे, सरिता मदनकर, लोमेश वैद्य, मुकेश बावणकर, शैलेश मयुर, विजय सावरबांधे, विजय ठवकर, यादव भोगे, नुतनताई कुर्झेकर, सुनंदाताई मुंडले, जयश्रीताई भुरे, विवेकानंद कुझेंकर, हिरालाल खोब्रागडे, मनोज कोवासे, चेतक डोंगरे, सोमेश्वर पंचभाई, हरिष तलमले, छोटु बाळबुद्धे, सीमाताई प्रशांत गिरी, राजेश्वर सामृतवार, नाशिकाताई वंजारी, शेखर पडोळे, विवेक रघुते, श्रीमती मनोरमाताई जांभुळे, संजय तळेकर, तुळशिदास कोल्हे, कुलदीप उराडे, हेमंत श्रृंगारपवार, राजेश वंजारी, दिलीप सोनुले, सरोज पवार, देवानंद गभने, पुरुषोत्तम गडकर, कुणाल पवार, केतन रामटेके, सुरज शेंडे, नितीन बरगंटीवार,

विपीन फुलबांधे, टिंकेश्वर वाघाये, जाबु शेख, कलीम शेख, नदिम पटेल, अशपाक खान, अध्यक्ष जामा मस्जिद, आशिफ खान, नजीर शेख, अर्जुन मांढरे, देवा, शिवरकर, सत्यपाल नगरे, केतन नगरे, राहुल मोहनकर, दत्तु गायधने, किरण गायधने, सुनिल देशमुख, संदिप कावळे, मंगेश देशमुख, रविंद्र बंजारी, प्रमोद कुंभलकर, विशाल खोब्रागडे, दिशांत कासारे, तुषार कराडे, पवनी तालुका व अड्याळ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अड्याळ येथील या कार्यक्रम प्रसंगी शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासाठी लढणारे खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन (अड्याळ) येथील जयश्री कुंभलकर, महेश कुंभलकर (नेरला) येथील सचिन लोहारे (पिंपळगाव को) येथील सचिन पंचभाई, अंबादास मरघडे यांच्या सोबत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. श्री पटेल यांनी सर्व प्रवेशित कार्यकर्त्यांचा पक्षाचा दुपट्टा वापरून स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *