- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : गोरेवाडा संरक्षित जंगलाला लागली आग, १५० हेक्टरवर जंगलाचे नुकसान

१५० हेक्टरवर जंगलाचे नुकसान

नागपूर समाचार : शहरातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयातील संरक्षित जंगलात रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास आग लागली. जंगल्याच्या डावीकडील भागातून ही आग लागली आणि पसरली. या आगीत येथील १०० ते १५० हेक्टरवर जंगालाचे नुकासान झाले आहे.

अग्निशमन विभागालाही ५ तासाचे र्शम घेतल्यानंतर आग आटोक्यात आणता आली. आग विझविण्याकरिता तीन गाड्या आत जंगलात पाठविण्यात आल्या होत्या. तर एक गाडी ही बाहेर सुरक्षात्मक दृष्टीकोणातून उभी ठेवण्यात आली होती. सुदैवाने या आगीत जंगलातील सर्व प्राणी हे सुरक्षित आहेत. शहरात उन्ह वाढत आहे. अशातच जंगलात आग लागल्यामुळे उन्हा आणि उष्ण वार्यामुळे ही आग जंगलात पसरली.

आगीची घटना वार्यासारखी पसरताच वनविभागाकडून अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या मुख्य अग्निश्मन विभागातून अर्थात सिव्हिललाईन येथून गाडी घटनास्थळी रवाना करण्यात आली. वेळोवेळी मिळत असलेल्या माहितीनुसार ही आग विझविण्याकरिता एकूण चार अग्निशमन बंब लागले. आगीच्या घटनेनंतर गोरेवाडा येथील पर्यटन तुर्तास बंद करण्यात आले आहे. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते.

दरम्यान, आगीची घटना घडल्यानंतर ज्या गाड्या जंगल सफारीवर होत्या, त्यांनाही तत्काळ परत बोलावण्यात आले होते. परंतु, अद्यापही ही आग कशाने लागली याचा पत्ता लागू शकला नाही. या आगीत जंगलाच्या सुरक्षा भिंतीच्या बाहेरील गावात आग लागल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. आग कशी लागली तूर्तास सांगणे कठीण असल्याची माहिती गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय प्रबंधक शतनिक भागवत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *