- नागपुर समाचार

डॉ.पां. स. खानखोजे स्मृती पुरस्कार व पुस्तक प्रकाशन समारंभ संपन्न, समरंभात नितीनजी गडकरी यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार दिले गेले.

नागपुर:- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कृषीतज्ञ डॉ.पां. स. खानखोजे स्मृती पुरस्कार व पुस्तक प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश व्हि.एस. सिरपूरकर साहेब होते. डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्या जीवन चरित्रावर लघुपट बनवून सोशल मीडियावर टाकल्या वरच खानखोजे यांचे कार्य घराघरात पोहचू शकेल, तसेच नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालून नवनिर्मिती करणे ही काळाची गरज आहे असे उद्गार रस्ते वाहतूक तथा परिवहन मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांनी ह्या समारंभात काढले. डॉ. खानखोजे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माननीय नितीनजी गडकरी यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

              नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. वंदना बडवाईक मॅडम यांनी खानखोजे यांच्या जीवन चरित्रावर लिहिलेले ‘असे होते खानखोजे’ या पुस्तकाचे प्रकाशन माननीय श्री. नितिन गडकरी व सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश श्री.व्हि.एस. सिरपूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाचे प्रकाशन ‘नचिकेत प्रकाशनने’ केले.
शाळेतील 75 वर्षे पूर्ण झालेल्या माजी शिक्षकांचा, खानखोजे यांचे सान्निध्य लाभलेल्या भारतीय विद्या प्रसारक संस्थेच्या सदस्यांचा तसेच माधवनगर निवासी वयाची ९५ वर्षे पूर्ण झालेल्या डॉ. वसंतराव देवपुजारी यांचा नितीन गडकरींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख अतिथी म्हणून पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरू डॉ. व्ही एम भाले, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला चे माजी कुलगुरू डॉ. श्री शरदराव निंबाळकर, माजी आमदार अनिल सोले, डॉ. खानखोजे यांची नात डॉ. गीतांजली सहानी, श्री भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सुधाकरराव सरोदे, सचिव श्री रमेश बक्षी, सहसचिव श्री अतुल गाडगे, श्री.अशोकराव सोरटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृती समितीचे अध्यक्ष श्री, सुनील खानखोजे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सौ स्मिता देशपांडे व डॉ.मानसी कोलते यांनी केले तर आभार प्रदर्शन नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. वंदना बडवाईक मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आजूबाजूच्या परिसरातील,अभ्यंकर नगर, माधव नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.