- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : परिवहन समितीद्वारे स्थायी समिती सभापतींकडे अंदाजपत्रक सुपूर्द

३८४.७७ कोटीचे अंदाजपत्रक : पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेवर भर

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीचे वार्षिक अंदाजपत्रक समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांच्याकडे गुरुवारी (ता.३) सुपूर्द केले. अर्थसंकल्पात सन २०२२-२३ चे उत्पन्न रू.३८४.७७ कोटी अपेक्षित आहे. तसेच या आर्थिक वर्षात रू. ३८४.५५ कोटी इतका खर्च होईल.

याप्रसंगी समिती सदस्या रूपा राय, सोनाली कडू, सदस्य नितीन साठवणे, नागेश मानकर, शेषराव गोतमारे, राजेश घोडपागे, विशाखा बांते, रूपाली ठाकूर, परिवहन व्‍यवस्थापक रवींद्र भेलावे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम व जनसंपर्क अधिकारी अरूण पिंपरूडे, स्थापत्य उपअभियंता केदार मिश्रा,विनय भारदवाज लेखाधिकारी, स्वीय सहायक तथा यांत्रिकी अभियंता योगेंद्र लुंगे आदी आदी उपस्थित होते.

तसेच १५व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत २०२०-२१ करिता ५१.६८ कोटी, २०२१-२२ करिता २५.८४ कोटी असे एकूण ७७.५२ कोटी निधी मंजुर करण्यात आलेला असून २०२२-२३ करिता २७.४० कोटी निधी देखील मंजुर करण्यात आलेला असून एकूण मंजुर निधी १०४.९२ कोटी निधी पैकी वाठोडा येथील डेपाच्या कामाकरिता ०८.कोटीची तरतूद वगळता ९६.९२ कोटीची तरतूद इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी करण्यात आलेली आहे.

२०२२-२३ पर्यंत १०४.९२ कोटी मधून २३३ मिडी बसेस खरेदी करणे प्रस्तावित असून २०२१-२२ पर्यंत प्राप्त ७७.५२ कोटी मधून पहिल्या टप्प्यात ११५ इलेक्ट्रिक बसेसे वेटलिजवर खरेदी करण्यात येणार आहे. दुस-या टप्प्यात प्राप्त निधीतून अंदाजे १०० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करणे प्रस्तावित आहे. यातून २०२२-२३ या वर्षात नागपूर शहरात ‘आपली बस’च्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी ५०टक्के बसेस या इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावतील. तसेच वाठोडा येथील १० एकर जागेवर नवीन डेपो तयार करण्यात येणार आहे.

यावर्षात १४५ कोटीची मागणी….

२०२२-२३ या वर्षाकरिता १४५ कोटी निधीची मागणी केली आहे. मनपाला आतापर्यंत प्राप्त् होत असलेल्या १०८ कोटी अनुदानात ३७ कोटी ज्यादा निधी आवश्यक असून २०२२-२३च्या अंदाजपत्रकात १४५ कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली.

४३८ बस धावणार…..

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात डीजल/सीएनजी ईंधनावर चालणा-या स्टॅन्डरर्ड, मिनी,मिडी बस मिळून एकुण २६२ बसेस धावणार आहे. तसेच स्मार्ट सिटी तर्फे १५ इलेक्ट्रिक बस, केन्द्र शासनाकडून ४० मिडी इलेक्ट्रिक बसेस व पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासनाकडून ११५ इलेक्ट्रिक मिडी बस प्राप्त होणार आहे. महिलांकरीता संचालनात असणा-या तेजस्विनी ६ इलेक्ट्रिक बस मिळून ४३८ बसेस संचालनात राहिल.

नागपूर नगरीचे मुख्य आकर्षण हे भारताचे “झिरो माईल स्टोन.” झिरो माईल हे आता हरित व पर्यावरण पुरक करण्याच्या दृष्टीने परिवहन समितीच्या वतिने परिवहन उपक्रमाच्या तेथील राखीव जागेवर ई-बसेस करीता “पथ अंत्योदय इलेक्ट्रिक बस आगार (चार्जिंग स्टेशन) ” उभारण्यात येणार आहे. अल्पावधीत त्याचे उभारणी कार्य पुर्णत्वास येणार असुन त्याचे लोकार्पण देशाचे मा.पंतप्रधान महोदय व मा.केद्रिंय मंत्री परिवहन यांचे शुभहस्ते आभासी पध्दतीने करण्याचा मानस आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *