नागपूर समाचार : 21 मार्च, आगीपासून बचाव कसा करावा, आगीवर नियंत्रण कसे मिळवावे आणि काय उपाययोजना कराव्यात याचे प्रशिक्षण नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकावर देण्यात आले. मेल आणि एक्स्प्रेस गार्ड अनिल पुराणिक यांनी रंगीत तालिम आयोजित केली.
या चाचणीत इलेक्टिड्ढक आणि ईटीएल, एस अँड टी स्टाफ, स्टेशनवर काम करणारे सर्व कॅटरिंग कर्मचारी, ऑपरेटिंग, टी सी स्टाफ, आरपीएफ, सी अॅण्ड डब्ल्यू, सीएचआई चे हाऊस किपिंग, विक्रेत्यासह वाणिज्य विभागातील कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता.
स्टेशन संचालक दिनेश नागदिवे आणि स्टेशन उपव्यवस्थापक प्रवीण रोकडे (यात्री सुविधा पर्यवेक्षक) यांनी संचालनात मदत केली. ही मॉक डड्ढील विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांच्या मार्गदर्शनात सुरक्षा शाखेद्वारा करण्यात आले. कर्मचाऱ्यमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी ही रंगीत तालिम होती.