- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपुर समाचार : भूजल पुनर्भरण आराखड्यानुसार निश्चित केलेली कामे प्राधान्याने पूर्ण करा – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

नागपूर समाचार : काटोल, नरखेड, हिंगणा, कळमेश्वर, उमरेड, भिवापूर व इतर भागात पिण्याच्या पाण्यासाठी मागणी आधारित जर कुठे टंचाई नोंदविली जाईल तिथे तत्काळ आवश्यकती कार्यवाही झाली पाहिजे. यापूर्वी अटल भूजलद्वारे जी कामे झाली आहेत. त्या ग्रामपंचायतींना भेटी देऊन त्या कामाबाबत निर्णय घेत आवश्यकता असेल दुरुस्ती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

नरखेड पाणी टंचाईबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता साखरकर, कृषी विभागाचे उपसंचालक डॉ. दत्ता येळे, भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या अधिकारी डॉ. वर्षा माने आदी उपस्थित होते.

काटोल, नरखेड भागात संत्रा पिकासाठी मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागात पाण्याचा उपसा अधिक आहे. पाणी प्रश्न दृष्टीपथात ठेऊन ज्या शेतकऱ्यांनी ठिबक सारख्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा मार्ग पत्करला त्याचे इतर शेतकऱ्यांनीही अनुकरण केले पाहिजे. नरखेड तालुक्यासाठी जो भूजल पुनर्भरण आराखडा तयार केला आहे त्याच धर्तीवर इतर तालुक्यांचा भूजल पुनर्भरण आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी भूजल सर्व्हेक्षण विभागाला दिले. 

रिचार्ज शाफ्ट, मृद व जलसंधारणाची कामे, वनविभाग, कृषी विभाग व पोकरा सारख्या योजना एकत्रीत राबविण्यासाठी सर्व विभागांनी आपला कृती आराखडा तयार करण्यास सांगितले. कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी जलपुनर्भरण, नाले व नद्यांचे खोलीकरण, गाळमुक्त तलाव ही कामे प्राधान्याने केली पाहिजेत. जिथे निधीची आवश्यकता आहे तसे प्रस्ताव तत्काळ सादर करण्यास त्यांनी सांगितले.