- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : रविकांत खोब्रागड़े यांना शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश देऊन कामगार सेनामध्ये पुर्व विदर्भाची जबाबदारी

नागपूर समाचार : पक्ष प्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार व मा. खासदार श्रिकांत शिंदेंच्या तसेच प्रमुख सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने रविकांत खोब्रागड़े यांना शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनामध्ये पुर्व विदर्भ अध्यक्ष (नागपुर, गोंदिया, भंडारा, चंद्रपुर, गढ़चिरौली, वर्धा) ची जबाबदारी कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांच्या हस्ते व विदर्भ अध्यक्ष आकाश हिरोळे यांच्या उपस्थितित देण्यात आली.

याप्रसंगी रविकांत खोब्रागड़े यांनी पक्षामध्ये निष्ठावान व प्रामाणिक राहून शिवसेना पक्ष मजबूत करणार आणि प्रत्येक कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहील तसेच मला कामगार सेनामध्ये पुर्व विदर्भाची कमान देण्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचं खूप खूप आभार मानतो तसेच खासदार श्रिकांत शिंदे, प्रमुख सचिव संजयजी मोरे, कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, संघटक नाना बच्छाव व विदर्भ अध्यक्ष आकाश हिरोळे या सर्वांचं आभार मानून कामगार सेनेत मला पुर्व विदर्भ पद मिळावे यासाठी या सर्वानी प्रयत्न केले म्हणून यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो.

यापक्षात प्रवेश व नियुक्तीच्या कार्यक्रमला अभिजीत बोबडे, सुनैना बोबडे, निलेश लोखंडे, सागर वानखेड़े, पंकज भालेराव, बोधिरत्न डोंगरे, मो. शाकीर अंसारी, सुनिल तायवाडे, सुनिल लव्हात्रे सह असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.