- Breaking News, विदर्भ

वर्धा समाचार : वर्धा जिल्ह्यातील हमाल कामगारांना एकूण रु.१,७५,३५,१९६ थकीत लेव्ही रक्कम मंजूर

आ. कुणावार यांचे पाठपुराव्यामुळे झाले शक्य, हमाल कामगारांनी व्यक्त केले आभार…

वर्धा समाचार : वर्धा जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्य हाताळणीचे काम करणाऱ्या हमाल कामगारांना माहे फेब्रुवारी २०१७ ते डिसेंबर २०२० या कालावधीतील ३० टक्के लेव्हीची थकीत रोखरक्कम अदा करण्यास शासनाने मंजुरी दिली असून हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार हमाल कामगारांची थकित असलेली एकुण देणी रु. १,७५,३५,१९६/- मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आली होती.     

 सदर दिर्घकालीन प्रलंबित प्रकरणी रोख रक्कम मंजुरीकरीता आमदार समीर कुणावार यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून हमाल कामगारांचा न्याय्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आ. कुणावार यांचे प्रभावी पाठपुराव्यामुळेच संबंधित कामगारांना थकीत लेव्ही रक्कम अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला असुन त्या

हमाल कामगारांनी कृतज्ञता व्यक्त करीत आमदार समीर कुणावार यांचे आभार मानले आहेत.

सदर प्रकरणात मा. उच्च न्यायालयातील रिट पिटीशन क्र. ६७७३/२०१७ मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तसेच रकमेची परिगणना व तपासणी शासनाच्या प्रचलित नियम व धोरणांनुसार करण्यात आली असल्याच्या अटीवर संबंधित देयके अदा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

एक वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून प्रलंबित असलेल्या या देयकांसंदर्भात वित्त विभागाच्या शासन निर्णय दि. १७ एप्रिल २०१५ अन्वये वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ मधील नियम क्र. ४० (१) अंतर्गत आवश्यक कार्यवाही करण्याचे अधिकार वापरून शासनाने ही मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे वर्धा जिल्ह्यातील शेकडो हमाल कामगारांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या प्रलंबित आर्थिक मागणीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.