नागपूर समाचार : महाराष्ट्र दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत अपर जिल्हाधिकारी प्रविण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे उपस्थित होते.
यावेळी पोलीस विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील व इतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




