- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : भारत मातेच्या मंदिराची कल्पना सर्वप्रथम स्व. मोरोपंत पिंगळे यांची – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

नागपुर समाचार : भारत मातेची पूजा केवळ मंदिरात नव्हे तर ती सर्वत्र आणि सर्वांना करावी लागेल. त्यासाठी आम्हा सर्वांना भारत बनावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी याप्रसंगी बोलताना केले.

सर्वप्रथम आम्हाला खरा भारत जाणून घ्यावा लागेल. त्यासाठी आम्हाला भारत जाणून घेण्याची पाश्चात्यदृष्टी दूर करावी लागेल, असेही डॉ. भागवत यावेळी म्हणाले. भारत मातेचे मंदिर व्हावे, ही कल्पना सर्वप्रथम स्व. मोरोपंत पिंगळे यांनी मांडली होती. त्या संकल्पनेला केवळ भारतदुर्गा मंदिराची जोड दिली गेली आहे, अशी माहितीही यावेळी सरसंघचालक भागवत यांनी दिली.