नागपूर समाचार : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर यांनी नागपूर येथील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर येथे अचानक भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सेवा व सुविधा यांचा सखोल आढावा घेतला.
या भेटीदरम्यान माननीय आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी बाह्यरुग्ण विभाग, आकस्मिक बाह्यरुग्ण विभाग, अत्याधुनिक प्रयोगशाळा, रक्तपेढी, एसएनसीयू (SNCU), विविध वॉर्डस्, ऑपरेशन थिएटर तसेच मिल्क बँक या विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली.भेटीदरम्यान अंतर्गत रुग्ण विभागातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी थेट संवाद साधून उपचार व सुविधांबाबत विचारपूस केली.
या प्रसंगी डॉ. दिलीप मडावी, वैद्यकीय अधीक्षक, सर्व वैद्यकीय अधिकारी, शुश्रूषा संवर्गातील कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित होते.




