सीटूच्या आशा वर्कर यांनी केला नागपूर महानगर पालिकेचा घेराव
लाडक्या बहीणिंना मिळाले पैसे पण ! आशा स्वयंसेविकांना कधी देणार थकित मानधन
नागपूर समाचार : आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू) नागपूर जिल्हा मधील महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शहरी आशांनी केंद्र व राज्याचे थकित मानधन, विविध प्रकारच्या केलेल्या सर्वेचा थकित निधी, प्रत्येक आरोग्य केंद्रात एका गटप्रवर्तकाची नेमणूक करण्यात यावी, के.टी.नगर आरोग्य केंद्रातील आशा वर्कर व इतर कर्मचाऱ्यांना प्रताडीत करणाऱ्या मेडिकल ऑफिसर यांची तात्काळ बदली करा. या विषयावर स्वयंस्फूर्तीने शहरातील शेकडो आशा वर्कर यांनी संपूर्ण महानगरपालिकेच्या घेराव करून महानगर पालिका प्रशासनाला चर्चा करण्याकरता बाध्य केले. महानगरपालिका आयुक्त यांनी शिष्टमंडळाला चर्चे करता बोलावले असता शिष्टमंडळाचे राज्य व केंद्राचे थकीत मानधन व इतर प्रश्नावर सविस्तर चर्चा केल्या. राज्य व केंद्र सरकार जेव्हा पर्यंत निधी पाठवणार नाही तेव्हापर्यंत आम्ही बाद्य आहोत असे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. शासनाकडून निधी आल्यास आम्ही त्वरित आशांना वाटप करू, आमच्याकडील थकबाकी दोन दिवसात देऊ, के.टी.नगर मधील प्रश्न तात्काळ सोडवू असे त्यांनी आश्वासन दिले.
शिष्टमंडळात कॉम्रेड प्रीती मेश्राम, माया कावळे, निलिमा कांबळे, सादिया कुरेशी, मयुरी सुखदेवे सह शेकडो आशा वर्कर उपस्थित होत्या. आज सकाळपासून राज्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे विविध प्रश्नाला घेऊन नागपूर जिल्हा अध्यक्ष कॉ.राजेंद्र साठे यांनी मद्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, पदवीधर मतदार संघाचे विधान परिषद सदस्य आमदार अभिजीत वंजारी, पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत यांना परस्पर भेटून विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानंतर मुख्यमंत्री सचिवालय येथे जाऊन मुख्यमंत्री यांचे नावे ९ तारखेला दिलेल्या मोर्चा दरम्यानच्या निवेदनाची विचारपूस करत मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर केले.
राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे राज्य अध्यक्ष ज्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा प्राप्त आहे. असे शेरसिंग उर्फ सतीश डागोर यांची त्यांचे बंगल्यावर जाऊन भेट घेतली. सतीश डागोर यांना निवेदन देताना मोठ्या संख्येत तिथे पण आशा वर्कर उपस्थित होत्या. आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांना घेऊन माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री व केंद्रीय आरोग्य मंत्री यांची चर्चा करून मार्ग काढून देण्याचे आश्वासन दिले. राजेंद्र साठेसह चर्चे दरम्यान महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक शेलोकर व मुख्य लेखापाल निलेश बाभरे उपस्थित होते.
महानगरपालिका इमारती समोर येईल उद्यानात सर्व आशा वर्कर समक्ष चर्चा करतांना राजेंद्र साठे यांनी सांगितले की, ३० सप्टेंबर पर्यंत मानधन न मिळाल्यास १ ऑक्टोबर पासून जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक बेमुदत संपावर जाणार. उद्या बेमुदत संपाची नोटीस महानगरपालिका व जिल्हा परिषद यांना सादर करण्यात येईल. तसेच मानधन मिळाल्यामुळे आशा वर्कर यांना उपासमारिची पाळी आली असून मोबाईल रिचार्ज करणे शक्य नसल्यामुळे २० सप्टेंबर पासून ऑनलाईन डाटा एन्ट्री चे काम बंद करण्यात येत आहे.




