नागपुर समाचार : रविवार, दिनांक १८ मे २०२५ रोजी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर या संस्थेच्या वर्ष २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सर्वसाधारण कार्यकारी संचालक पदांची निवडणूक उत्साहात पार पडली. या निवडणुकीत ‘एकता आदर्श पॅनल’ चे सर्व उमेदवार सेवक प्रचंड मताधिक्याने विजयी झाले.
विजयानंतर, सोमवार दिनांक १९ मे २०२५ रोजी सर्व विजयी सेवक उमेदवारांनी परमपूज्य परमात्मा एक सेवक सांस्कृतिक भवन – ‘मानव मंदिर’, वर्धमान नगर, नागपूर येथे भेट देऊन महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली.
या प्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा. श्री. मारोतरावजी राऊत, श्री. जगन्नाथजी सोनकुसरे, माजी व आजी पदाधिकारी, तसेच सेवक व सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आले.