नागपूर समाचार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजदिन निधी-२०२३ संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ध्वजदिनी निधीसाठी स्वतःचा एक महिन्याचा पगार देण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केली.

विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, नागपूरच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव डॉ. नितीन राठोड आदी उपस्थित होते.





