प्रेस नोटनागपूर बाजार पत्रिका :भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व्ही एन रेड्डी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फॉउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व्ही एन रेड्डी यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ५३ वा वाढदिवस सेवा दिन व रुग्ण मित्र म्हणून साजरा केला सेवा दिनानिमित्त व्ही एन रेड्डीनी राज्य निवडणूक आयोग तर्फे मतदान ओळखपत्र, व तहसीलदार नागपूर शहर यांच्या तर्फे आधार कार्ड शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या मुलांचे आधार कार्ड अद्यावत करून घेतले व युवकांनी आपले मतदार कार्ड बनवून घेतले आधार आणि मतदार या दोन्ही सेवांचे लाभ तेथील नागरिकांनी घेतला.
जुलै महिन्यात पावसाने जोर पकडला असून ज्यांचे घर कवेलूचे आहे त्यांना तळपात्री देऊन त्यांना आधार दिला व घर गळतीपासून त्यांचे समाधान केले. गोरगरिब नागरिकांना राशनकिट देऊन त्यांना मदत केली. अशा प्रकारे व्ही एन रेड्डी यांनी देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा केला व समाजात लोकसेवा हीच ईश्वर सेवा आहे. हे सिद्ध केले नागरिकांनी सुद्धा या सेवा दिनाचा लाभ घेऊन व्ही एन रेड्डीचे आभार मानले.