नागपूर समाचार : काळ बदलतो तसे कलाकार देखील बदलतात परंतु आपल्या काळातील कलाकार, गायक, गाणी यामध्ये रमणे आनंददायी असते असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या काळातील आठवणी पुन्हा जगवता याव्या आणि आपल्या काळातील आठवणीं मध्ये रमता यावे, त्याचा आनंद घेता यावा यासाठी खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केल्याचे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी दिग्दर्शक राजदत्त यांच्या कार्याचे आणि चित्रपट सृष्टीतील योगदानाचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. तसेच अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा देखील सत्कार त्यांनी केला. यावेळी मुलाखतकार अजय गंपावार, गायक मंडळी, वादक मंडळी, तांत्रिक सहकार्य करणाऱ्या सर्वांचे गडकरी यांनी कौतुक करून त्यांचा सन्मान केला.




